कोका कोला विकणार नारळ पाणी आणि उसाचा रस


सॉफ्टड्रिंक क्षेत्रातील नामवंत कंपनी कोका कोला त्याच्या भारतातील व्यवसाय विस्ताराबद्दल आक्रमक नीती स्वीकारण्याच्या तयारीत आहे. येत्या काही वर्षात कंपनी खास भारतीय चवीची स्थानिक देशी पेये बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. त्यात अन्य फळांच्या रासंबरोबर नारळ पाणी आणि उषाचा रस याचाही समावेश केला जाणार आहे. कोका कोला इंडियाचे दक्षिण पश्चिम आशियाचे अध्यक्ष टी. कृष्णकुमार यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले कोका कोला सध्या त्याच्या उपलब्ध उत्पादनांपैकी ५० टक्के पेये भारतातच तयार करते आहे. थम्सअप, लिम्का, माझा ही स्थानिक चवीची पेये लोकप्रिय झाली आहेत. भारतात प्रत्येक राज्याचे स्वतःचे विशेष पेय आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यात अशी एक दोन उत्पादने आम्ही सादर करणार आहोत. तीन वर्षात अश्या देशी पेयांची मोठी मालिका आम्ही सादर करत आहोत. त्याचा आमच्या व्यवसाय विस्ताराला मोठा हातभार लागेल अशी खात्री आहे.

Leave a Comment