Skip links

शेतात मालकाला अशी मदत करतो ‘हा’ कुत्रा


अतिशय प्रामाणिक प्राणी म्हणून कुत्रा हा ओळखला जातो. हे काही नव्याने तुम्हाला सांगायला नको. तुम्ही सायकल चालवणारा कुत्रा सर्कसमध्ये पाहिला असेल. पण आपल्यासाठी एका बुद्धिमान कुत्र्याची माहिती घेऊन आज आम्ही आलो आहे. हा कुत्रा ट्रॅक्टर चालवतो. एवढेच नाही तर आपल्या शेतकरी मालकाला शेतात कामात मदत करतो.

जगभरात नॉर्दन आयलंडमध्ये राहाणारे अल्बर्ट रीड यांचा रॅम्बो चर्चेचा विषय बनला आहे. तुम्ही देखील आजपर्यंत असा बुद्धिमान कुत्रा पाहिला नसेल. याबाबत ६ वर्षाच्या रॅम्बोचे मालक अल्बर्ट यांनी सांगितले की, रॅम्बोची शेतात काम करताना त्यांना मोठी मदत होते. त्यांना रॅम्बो पेरणी, कापणीत मदत करतो. रॅम्बो ट्रॅक्टर चालवतो तेव्हा कोणाचाच विश्वास बसत नाही.

अल्बर्ट यांनी रॅम्बोला ट्रॅक्टर चालवण्यासाठी खास ट्रेनिंग दिली आहे. रॅम्बो अल्बर्ट यांच्या मार्गदर्शनाने स्टेअरिंग फिरवतो. अल्बर्ट यांनी आपल्या ट्रॅक्टरममध्ये रॅम्बोसाठी खास सीटही बसवले आहे. अल्बर्ट यांच्या रॅम्बोला पाहाण्यासाठी लांब-लांबून लोक येतात. अल्बर्ट सांगतात की, रॅम्बोला ट्रॅक्टर चालवतांना पाहून लोक थक्क होतात. रॅम्बोचे कोणी फोटो क्लिक करतो तर कोणी त्याचा व्हिडिओ शूट करतात.

Web Title: One dog went to mow: Rambo the golden retriever shows off his amazing TRACTOR DRIVING skills