‘पावर नॅप’ आवश्यक का?


रात्री किमान सात तासांची झोप शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याकरिता आवश्यक आहे, हे आपण सर्व जण जाणतोच. पण दिवसाकाठी एकदा, कामाच्या व्यापातून दहा मिनिटे वेळ काढून घेतलेला ‘पावर नॅप’ म्हणजेच लहानशी वामकुक्षी, मनावरील कामाचा तणाव कमी करते. त्याशिवाय तणावामुळे उद्भविणारे आजार चाळीस टक्क्यांनी कमी होतात असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पावर नॅप, शरीराला आणि मनाला विश्रांती देण्यासाठी काही मिनिटांच्या विश्रांतीला म्हटले गेले आहे. ही पावर नॅप, तुमची काम करण्याची क्षमता आणखी सुधारण्यास सहायक आहे. कामातून पंधरा मिनिटे वेळ काढून घेतलेली पावर नॅप तुम्हाला ताजेतवाने बनवेल आणि शरीरामध्ये स्फूर्ती, उत्साह निर्माण करेल.

अनेक रिसर्च मधून हे तथ्य सिद्ध केले गेले आहे की, दिवसामध्ये पंधरा मिनिटे घेतलेल्या या पावर नॅप मुळे मनावरील तणाव वाढविणारे हार्मोन्स कमी होतात. तसेच शरीरामध्ये उर्जा वाढते. त्यामुळे तुम्ही तुमचे काम अधिक चांगल्या पद्धतीने करू शकता. काम करण्यातील तुमची एकाग्रता वाढण्यासही यामुळे मदत होते.

रात्रीची सात तासांची झोप आणि त्याच्या जोडीने दिवसाकाठी पंधरा मिनिटे घेतलेली पावर नॅप तुमच्यासाठी एक प्रकारे ‘ मोटीव्हेशनल एक्सरसाईझ ‘ आहे. या पंधरा मिनिटांच्या वामकुक्षीमुळे तुमची अपुरी राहिलेली झोप पूर्ण होते, थकव्यामुळे शरीरामध्ये आलेला जडपणा कमी होतो, आणि शरीराचा थकवा देखील कमी होतो. अनेकदा झोप अपुरी झालेली असली की चिडचिड वाढते, लहान सहान गोष्टींमध्ये सहनशक्ती संपू लागते. पावर नॅप मुळे अश्या प्रकारच्या मनस्थितीवर नियंत्रण मिळविणे शक्य होते. दिवसाकाठी पंधरा वीस मिनिटांसाठी घेतलेल्या वामकुक्षीमुळे हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहते. तसेच शरीरामधील हार्मोन्सचे संतुलन देखील व्यवस्थित राहते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment