फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीतून नीरव मोदीची गच्छंती


फोर्ब्स या जगप्रसिद्ध व्यावसायिक नियतकालिकाच्या अब्जाधीश लोकांच्या यादीतून घोटाळेबाज नीरव मोदी याची गच्छंती झाली आहे. पंजाब नॅशनल बँकला 12हजार कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप नीरव मोदी याच्यावर आहे.

फोर्ब्स नियतकालिकाच्या 2017 च्या अतिश्रीमंतांच्या यादीमध्ये नीरव मोदी याचा समावेश होता त्यावेळी त्याची संपत्ती अठरा अब्ज डॉलर एवढी दाखविण्यात आली होती मात्र त्याला यंदाच्या यादीमध्ये स्थान मिळालेले नाही.

पापा जॉन पिझ्जाचा संस्थापक जॉन natak दक्षिण आफ्रिकेतील ख्रिस्तोफर वेळेस आणि सौदी अरेबिया राजकुमार अलवालीद बिन तलाल यांचा या वर्षीच्या यादीतून गळालेल्यांमध्ये समावेश आहे, असे फोर्ब्सने म्हटले आहे. तसेच भारतातील अब्जाधीशांची संख्या गेल्या वर्षीपेक्षा वाढल्याचेही स्पष्ट केले आहे.

फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार भारतात 119 अब्जाधीश आहेत. गेल्या वर्षीपेक्षाही ही संख्या 18 ने जास्त आहे. या सर्वांच्या संपत्तीचे एकत्रित मूल्य 440.1 अब्ज आहे. हिरे व्यापारी असलेल्या नीरव मोदी आणि त्याचा व्यावसायिक भागीदार मेहुल चोक्सी यांनी बनावट कर्ज प्रकरणांच्या माध्यमातून पीएनबीला 12600 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. नीरव मोदी कुटुंबीयांशी संबंधित २९ मालमत्ता आणि १०५ बँक खाती प्राप्तिकर खात्याने गोठवली आहेत.

Leave a Comment