ह्या पदार्थांच्या सेवनाने कोलेस्टेरोल होईल कमी


पिझ्झा, बर्गर, सामोसे हे आणि असे कितीतरी चमचमीत पदार्थ आठवले की तोंडाला पाणी सुटते ना? पण ह्या पदार्थांचे अतिसेवन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असले, तर धोका उद्भवतो कोलेस्टेरोल वाढण्याचा. कोलेस्टेरोलचे प्रमाण वाढू नये म्हणून आपल्या आहारामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स चे प्रमाण कमी असणे गरजचे आहे. आपल्या आहारामध्ये काही पदार्थांचा समावेश केला तर कोलेस्टेरोलचे प्रमाण नियंत्रणामध्ये ठेवने सोपे होईल.

सोयाबीनमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स जवळजवळ नाहीतच. त्याशिवाय यामध्ये असलेली प्रथिने शरीरातील कोलेस्टेरोल कमी करण्यास सहायक आहेत. दररोज आपल्या आहारामध्ये साधारण पंधरा ग्राम सोयाबीन समाविष्ट केल्याने शरीरातील कोलेस्टेरोल सहा टक्क्यांनी कमी होऊ शकते. बार्ली हे धान्य beta glucan नामक स्लोयुबल फायबर ने युक्त आहे. हे धान्य सेवन केल्याने यामध्ये असलेले beta glucan एक प्रकारच्या जेल मध्ये रुपांतरीत होऊन कोलेस्टेरोल ‘bind’ करण्याचे काम करीत असते. हे बाइंड झालेले कोलेस्टेरोल शरीरामध्ये अवशोषित होऊ शकत नाही. आहारतज्ञांच्या मते आपल्या दैनंदिन आहारामध्ये तीन ग्राम beta glucan असणे गरजेचे आहे.

वाल, राजमा, चवळी सारखी कडधान्ये कोलेस्टेरोल कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे आपल्या आहारामध्ये कडधान्यांचा समावेच अवश्य असावा. या कडधान्यांची उसळ करावी, किंवा सूप मध्ये शिजवून घेतलेल्या कडधान्यांचा समावेश करावा. कडधान्य फायबर ने युक्त असल्याने यांच्या सेवनाने पचनशक्ती देखील चांगली राहते. आपल्या आहारामध्ये लसूण अवश्य समाविष्ट असावे. लसणीच्या सेवनाने कोलेस्टेरोल कमी होतेच, पण त्याशिवाय लसणीच्या सेवनाने ब्लड क्लॉटिंग होत नाही, तसेच रक्तदाबही नियंत्रित राहतो. व्हायरल इन्फेक्शन पासून देहील लसणीच्या सेवनाने बचाव होऊ शकतो. त्यामुळे दररोज किमान तीन ते चार लसणीच्या पाकळ्यांचे सेवन करायला हवे. अनेक व्यक्ती सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी लसणीची पाकळी चावून खातात. ज्यांना लसणीची चव आवडत नसेल, त्यांनी पाण्याबरोबर लसणीची पाकळी घेतली तरी याचे उत्तम परिणाम दिसून येतील.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment