
नवी दिल्ली – आपल्या ग्राहकांसाठी होळी भेट देत रिलायन्स बिग टीव्हीने वर्षभर सेवा मोफत देण्याची घोषणा केली. आता ५०० फ्री टू एअर चॅनेल्स पाच वर्षांसाठी आणि पे चॅनेल्स एक वर्षासाठी कंपनीकडून मोफत दाखविण्यात येणार आहेत. देशातील लोकांना रिलायन्स बिग टीव्हीकडून टीव्ही सेटवर करमणूक पाहण्याची पद्धत बदलण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आता नवीन ऑफर्ससह करमणूक मोफत झाली आहे असे रिलायन्स बिग टीव्हीचे संचालक विजेंदर सिंह यांनी म्हटले.
बिग टीव्हीच्या सेट टॉप बॉक्सवर पे चॅनेल्स वर्षभरासाठी मोफत
एक एचडी एईव्हीसी सेट टॉप बॉक्स रिलायन्सकडून मोफत देण्यात येणार आहे. ग्राहकांसाठी ही नोंदणी सुरू झालेली आहे. सरकारच्या डिजिटल इंडियाचा डीटीएच हा हिस्सा आहे. ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ४९९ रुपयांचे प्री बुकिंग रक्कम जमा करावी लागणार आहे. सेट टॉप बॉक्स आणि आऊटडोअर यूनिटच्या माध्यमातून ग्राहकांना १५०० रुपयांची रक्कम द्यावी लागणार आहे. दुस-या वर्षापासून ग्राहकांना सर्व पे चॅनेल्स पाहण्यासाठी ३०० रुपयांचे महिन्यासाठीचे रिचार्ज करावे लागेल. ग्राहक जेव्हा दोन वर्षांपर्यंत पे चॅनेल्सचे सब्सक्रिप्शन पूर्ण करतील त्यावेळी त्यांना १,९९९ रुपये रॉयल्टी बोनस स्वरुपात परत देण्यात येतील. लॉयल्टीमध्ये बुकिंगच्या दरम्यान जमा करण्यात आलेली रक्कम आणि सेट टॉप बॉक्सच्या किमतीचा समावेश आहे.
