स्वस्त झाला घरगुती सिलेंडर


नवी दिल्ली – सरकारने सिलेंडरच्या किमतीत कपात करत दिलासा दिला असून ४७ रुपयांनी विना अनुदानित एलपीजी सिलेंडर रुपये आणि २.५७ रुपयांनी अनुदानित सिलेंडर स्वस्त करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्याही किमतीत कपात करण्यात आली आहे. नवीन दर एक मार्चपासून लागू करण्यात आले आहेत. मुंबईतील अनुदानित सिलेंडरच्या किमती ४९३.३७ वरून ४९०.८० रुपयांवर पोहोचल्या आहेत. याचप्रमाणे विनाअनुदानित सिलेंडर ७०८ वरून ६६१ रुपयांवर पोहोचला आहे.

Leave a Comment