निधनानंतरही गूगल सर्चमध्ये ‘श्रीदेवी’ टॉप


नवी दिल्ली : सिनेसृष्टीसह जगभरातील चाहत्यांवर प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या आकस्मिक निधनामुळे शोककळा पसरली. श्रीदेवी यांनी शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास दुबईत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर सगळ्याच चाहत्यांना श्रीदेवी यांच्याबद्दल अधिक महिती जाणून घेण्याची उत्सुकता लागली आणि अर्थात त्यासाठी त्यांनी ‘गूगल’ची मदत घेतली .

गूगलवर रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ‘Sridevi/श्रीदेवी’ ही नावे १० लाखांपर्यंत सर्च केले गेले. ‘श्रीदेवी’ नावाच्या सर्चचा आकडा दुपारी ४ वाजता ५० लाखांवर गेला, त्यानंतर या आकड्याने संध्याकाळी ६ वाजल्यानंतर एक कोटींचा टप्पा पार केला.

श्रीदेवी या मूळच्या दक्षिण भारतातील असल्याने, फेसबुकवर त्यांच्या नावाने सर्च करण्यात दक्षिण भारतातील यूझर्सची संख्या मोठी होती. ‘श्रीदेवी’ यांचे नाव कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओदिशा या राज्यांमधील यूझर्सनी सर्वाधिक वेळा गूगलवर सर्च केले.

Leave a Comment