विमानसेवांमध्ये हायस्पीड इंटरनेट डाटा कनेक्टीव्हिटी देणार एअरटेल


मुंबई : देशभरातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेल लवकरच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवांमध्ये हायस्पीड इंटरनेट डाटा कनेक्टीव्हिटी देणार असून एअरटेलने याकरिता ‘सिमलेस एलायंस’ सोबत करार केला आहे. वनवेब, एयरबस, डेल्टा आणि स्प्रिंट यासारख्या कंपन्या यामध्ये होत्या. या सगळयांसोबत केलेल्या करारानंतर विमानप्रवास करताना वेगवान स्वरूपात इंटरनेट सेवा मिळणार आहे. याकरिता सॅटेलाईट टेक्निकचा वापर करण्यात येणार आहे.

याबाबतची घोषणा बर्सिलोनामध्ये आयोजित मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस २०१८ दरम्यान करण्यात आली. सीमलेस एलायंसच्या ५ फाऊंडिंग सदस्यांसोबत इंडस्ट्रीतील अनेक सदस्य यामध्ये सहाभागी होणार आहेत. याबाबत एअरटेलने दिलेल्या माहितीनुसार, सीमलेस एलायंसचे पार्टनर झाल्यानंतर मोबाईल ऑपरेटर्स आणि एअरलाईन्समध्ये नवे पर्व सुरू झाले आहे.

एअरटेल ही देशातील सगळ्यात मोठी आणि जगातील तिसरी मोठी मोबाईल ऑपरेटर कंपनी आहे. दक्षिण आशिया आणि आफ्रिकेमध्ये एअरटेल सर्वाधिक वापरले जाते. ही सुविधा मिळाल्यास विमान प्रवासादरम्यान विना अडथळा इंटरनेट सुविधा मिळणार आहे.

Leave a Comment