बॉडी पेंट करुन प्रियकराला भेटण्यास पोहोचली मॉडेल


आज आपण सुंदर दिसण्यासाठी काय करू हे काही आपणही सांगू शकत नाही. आपण त्यासाठी महागडे कपडे, चांगल्यातील चांगला मेकअप, प्लास्टिक सर्जरी वैगेरे असे अनेक उपाय करतो. पण या मॅडमने वेगळीच शक्कल लढवली. या सौंदर्यवतीने डेटवर जाण्यासाठी भरजरी कपड्यांऐवजी चक्क बॉडी पेंट करण्याला प्राधान्य दिले. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा तिच्या प्रियकराच्याही लक्षात आले नाही की आपल्या प्रेयसीने अंगावर एकही कपडा घातलेला नाही.

आपल्या प्रियकराच्या भेटीवेळी जॉय नावाची ही मॉडेल काही तरी ‘हटके’ करु इच्छित होती. तिने त्यासाठी प्रसिद्ध बॉडी पेंटर जेन सिडलची भेट घेतली. तिच्या बॉडीवर जेनने एवढे सुंदर पेंट केले की तिला पाहाताक्षणी कोणालाही लक्षात आले नाही की जॉयने जीन्स – टॉप घातलेला नसून बॉडी पेंट केलेले आहे.

जेव्हा जॉय बॉडी पेंट करुन तिच्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी एका मॉलमध्ये पोहोचली तेव्हा तिला पाहून कोणालाही लक्षात आले नाही की ती निर्वस्त्र आहे. तिच्या डेटिंग पार्टनरला तिने अनेकदा हिंट दिली परंतू त्याच्याही लक्षात आले नाही. तिने जेव्हा स्वतः त्याला सांगितले की माझ्या शरीरावर एकही कपडा नाही तेव्हा त्याला शॉकच बसला.

Leave a Comment