हे आहेत ऑस्ट्रेलियाचे विचित्र कायदे


जगभरातील प्रत्येक देशांचे त्यांचे विविध कायदे असून ते कायदे ऐकून आपण अचंबित होतो. लग्नापूर्वी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे काही देशांत कायद्याने गुन्हा आहे तर काही देशांत महिलांना ड्रायव्हिंग बेकायदेशीर आहे. पण तुम्हाला आम्ही आज ऑस्ट्रेलियातील १० धक्कादायक कायद्यांविषयी सांगणार आहोत. अगदी सामान्य पण हैराण करणारे असे ऑस्ट्रेलियाचे हे कायदे आहेत.

ऑस्ट्रेलियातील मुले दारूच नव्हे तर सिगारेट, कंडोमसुध्दा खरेदी करू शकत नाहीत. जर तेथील मुलांनी असे केले तर त्यांना शिक्षा भोगावी लागते. पण मुलांनी दारू-सिगारेट प्यायल्यास त्यासाठी कोणताच कायदा येथे अस्तित्वात नाही.

ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये महिला ६ स्क्वेअर इंचपेक्षा मोठी बिकिनी परिधान करून शकत नाही. जर एखाद्या महिलेने असे केले तर ते कायद्याचे उल्लंघन केल्याचे मानले जाते. ऑस्ट्रेलियाच्या कायद्यानुसार, येथे वयाच्या १६व्या वर्षी मुले शारीरिक संबंध प्रस्थापित करू शकतात. हे कायदेशीरत्या मान्य असून पण जे मुले कस्टडी किंवा केअरमध्ये आहेत, ते वयाच्या १८ व्या वर्षानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित शकतात.

ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया शहरात तुम्ही तुमच्या घराचे बल्ब स्वत: बदलू शकत नाहीत. त्यासाठी तुम्हाला एखाद्या लायसेन्सी इलेक्ट्रिशनला बोलवावे लागते. ऑस्ट्रेलियामध्ये रस्त्याच्या उडव्या बाजूला चालणे बेकायदेशीर आहे. इतकेच नव्हे, तुम्ही फुटपाथवरसुध्दा उजवीकडे चालू शकत नाहीत. जर तुम्ही असे केले तर ते कायद्याचे उल्लंघन केल्यासारखे आहे. येथील कायद्यानुसार, ब्राइटन बीचवर महिला छोटी बिकिनी परिधान करून ना स्विमिंग करू शकतात ना अंघोळ करू शकतात. त्यांना असे करण्यासाठी गळ्यापासून गुडघ्यापर्यंत स्विम सुट घालावा लागतो.

ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरियामध्ये रविवारी पिंक कलरची पँट परिधान करण्यावर बंदी आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जर तुम्ही एखाद्या प्राण्याचे मांस खात असाल तर त्याने नाव घेणे बेकायदेशीर आहे. येथे बॅटमॅन आणि रॉबिनसारख्या ड्रेस परिधान करणे कायद्याने गुन्हा आहे. येथे पबमध्ये दारू पिणे बेकायदेशीर आहे.
व्हिडीओ सौजन्य – Hindi TV India