पंजाब नॅशनल बँकेत आणखी एक घोटाळा? 10000 खातेदारांची माहिती चोरीला


पंजाब नॅशनल बँकेतील 11401 कोटी रुपयांचा घोटाळा अद्याप विस्मरणात गेलेला नाही, तोच या बँकेतील आणखी एक घोटाळा समोर आला आहे. या बँकेतील तब्बल 10 हजार खातेदारांचा क्रेडिट आणि डेबिट कार्डचा माहितीसाठा लिक झाला असल्याचा दावा एका वर्तमानपत्राने केला आहे.

हाँगकाँगमधील एशिया टाईम्स या वर्तमानपत्राने एका तज्ज्ञाच्या हवाल्याने यासंबंधातील बातमी छापली आहे. या वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार, पीएनबीच्या खातेदारांची क्रेडिट व डेबिट कार्डची अत्यंत गोपनीय माहिती गेल्या 3 महिन्यांपासून एका संकेतस्थळावर विकली विक्री व विकत घेतली जात होती.

क्लाऊडसेक या कंपनीने बुधवारी पीएनबीला ही माहिती दिली, असेही या बातमीत म्हटले आहे. क्लाऊडसेक ही सिंगापूरमध्ये नोंदणी झालेली कंपनी असून तिचे एक कार्यालय बंगलोर येथेही आहे. ही कंपनी बेटाच्या खरेदी-विक्रीवर नजर ठेवते.

पीएनबीशी संबंधित देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा अलीकडेच उघडकीस आला आहे. त्यावर कारवाई चालू असतानाच ही नवीन माहिती उघड झाल्यामुळे बँकेच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Leave a Comment