हे खेळ खेळणारे अॅथलिट्स होतात दीर्घायुषी


नियमित व्यायामाचे आपल्या शरीराला आणि एकंदर आरोग्याला अनेक फायदे आहेत आहे आपणा सर्वानाच ठाऊक आहे. प्रत्येकाची व्यायाम करण्याची क्षमता, आवड आणि व्यायामप्रकारची निवड वेगवेगळी असू शकते. काहींना योगासने आवडतात, काहींना एरोबिक्स, तर काही लोक निरनिराळे खेळ खेळतात. पण सर्व खेळांमध्ये काही खेळ आरोग्याच्या दृष्टीने आशिक चांगले समजले जातात. हे खेळ खेळणाऱ्या व्यक्ती दीर्घायुषी होतात असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. या संबंधी ऑस्ट्रेलिया आणि युरोप मधील शास्त्रज्ञांनी केलेल्या रिसर्चचा रिपोर्ट ब्रिटीश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन मध्ये प्रसिद्ध झाला आहे. या रिसर्चमध्ये शास्त्राद्यांनी इंग्लंड आणि स्कॉटलंड मधील सुमारे ८०,००० लोकांचे अवलोकन केले. हे लोक चौदा वर्षांपेक्षा जास्त काळ कोणता ना कोणता खेळ खेळत होते.

या सर्व खेळांमध्ये पोहणे आणि रॅकेट गेम्स, म्हणजेच टेनिस, स्क्वाश, बॅड मिन्टन, टेबल टेनिस हे खेळ खेळणाऱ्या व्यक्तींचे स्वास्थ्य सर्वोत्तम असल्याचे शास्त्रज्ञांचे निदान आहे. पोहोणे आणि रॅकेट स्पोर्ट्स हाय इंटेन्सिटी वर्क आउट्स आहेत. त्यामुळे इतर स्पोर्ट्स पेक्षा हे खेळ दीर्घायुषी राहण्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरत आहेत.

सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या लोकांपैकी पोहणे आणि रॅकेट स्पोर्ट्स हे दोन खेळ खेळणाऱ्या व्यक्ती अधिक काळ निरोगी राहत आहेत हे देखील स्पष्ट केले गेले आहे. त्याचप्रमाणे गोल्फ आणि क्रिकेट हे टेक्निक आणि शारीरिक श्रम अधिक असणाऱ्या खेळांपेक्षा, पोहणे आणि रॅकट स्पोर्ट्स अधिक फायद्याचे असल्याचे आणि याचे फायदे जास्त काळाकरिता दिसून येत असल्याचे निदान वैज्ञानिकांनी केले आहे. त्याचप्रमाणे रग्बी, फूटबॉल, आईस हॉकी या खेळांपेक्षा रोईंग आणि टेनिस हे खेळ आरोग्याच्या दृष्टीने जास्त फायदेशीर असल्याचे शास्त्रज्ञ म्हणतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment