
नवी दिल्ली : दररोज नवनव्या ऑफर्स टेलिकॉम सेक्टरमधील कंपन्या सादर करत असून रिलायन्स जिओ पासून एअरटेल, वोडाफोनपर्यंत सर्वांनी आपल्या प्लान्सचे दर कमी केले आहेत. त्यात आता ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एअरटेलने नवी ऑफर सादर केली आहे. ग्राहकांना ज्यामध्ये खूपच स्वस्तात अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे.
अवघ्या ९ रुपयांत एअरटेल देणार अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट
प्रीपेड ग्राहकांसाठी एअरटेलने केवळ ९ रुपयांचा प्लान लॉन्च केला आहे. या प्लानची खास गोष्ट अशी की, ग्राहकांना जे १०० रुपयांच्या प्लानमध्ये मिळते ते सर्वकाही ९ रुपयांत मिळणार आहे. एअरटेलच्या ऑफरमध्ये प्रीपेड ग्राहकांना अनलिमिटेड वॉईस कॉलिंग, १०० SMS आणि १०० एमबी इंटरनेट डेटा मिळणार आहे. हा सर्वात स्वस्त प्लान असल्याचे म्हटले जात आहे. सर्व ऑपरेटिंग सर्कल्समध्ये एअरटेलचा हा प्लान उपलब्ध असणार आहे. युजर्स ऑफिशियल वेबसाईट व्यतिरिक्त इतर ठिकाणी रिचार्ज करुन हा प्लान घेऊ शकतात. या प्लानची वैधता एका दिवसाची आहे.
