ह्या फिटनेस ट्रेंड्स स्वीकारा आणि फिट राहा


आजच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या युगामध्ये, प्रत्येकाला स्पर्धेला तोंड देण्यासाठी आपण तंदुरुस्त, फिट असावे असे वाटत असते, यात शंका नाही. पण फिट राहण्यासाठी सतत एकाच प्रकारचे व्यायाम केल्याने लोक कंटाळून जातात, आणि मग कालांतराने व्यायामाची ओढ कमी होऊ लागते. असे होऊ नये या करिता आपल्या जुन्या व्यायामपद्धतीमध्ये थोडेसे परिवर्तन आणून, काही नव्या फिटनेस ट्रेंड्स आत्मसात केल्यास आपले वर्क आउट्स जास्त रोचक बनतील.

आपले आरोग्य आणि शारीरिक क्षमता सुधारण्यासाठी आपल्या वर्क आउट्स मध्ये तुम्हाला अनेक लहान मोठे बदल करावे लागतील. नेहमीच्या व्यायामपद्धतीच्या ऐवजी तुम्ही योगसाधना, किक बॉक्सिंग, झुम्बा या व्यायामप्रकारांच्या माध्यमातून देखील फिट राहू शकता. जर एकट्याने वर्क आउट करणे तुम्हाला आवडत नसेल, एकट्याने वर्क आउट करण्याचा कंटाळा येत असेल, तर एखाद्या फिटनेस ग्रुपमध्ये सहभागी होण्याचा विचार तुम्ही करू शकता. सर्वांनी मिळून व्यायाम केल्याने व्यायाम कंटाळवाणा होत नाही आणि एकमेकांकडून प्रोत्साहन देखील मिळत राहते.

आपल्या व्यायामाला तंत्रज्ञानाची जोड देत फिटनेस अॅप्स, अॅक्टीव्हिटी ट्रॅकर्स, स्मार्ट वॉचेस यांचा वापर करा. तुम्ही करीत असलेल्या व्यायामाने किती कॅलरीज खर्च झाल्या, हृदयाच्या ठोक्यांची गती काय होती, ही सर्व माहिती तुम्हाला या अॅप्स आणि स्मार्ट वॉचेसच्या मदतीने मिळू शकते. या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या व्यायामामध्ये लहान मोठे सुधार करू शकता.

सध्याच्या फिटनेस ट्रेंड मध्ये बॉडी वेट ट्रेनिंग खूप लोकप्रिय ठरत आहे. या व्यायामप्रकाराद्वारे कॅलरीज खर्च होतात, आणि स्नायू देखील उत्तम प्रकारे टोन होतात. ह्या व्यायामप्रकारामुळे शरीर मजबूत बनते. रोजच्या व्यायामप्रकारांमध्ये थोडी विविधता आणण्यासाठी तुम्ही किक बॉक्सिंग, झुम्बा, पिलाटीज या व्यायामप्रकारांचा समावेश आपल्या वर्क आउट रुटीनमध्ये करू शकता. हे व्यायामप्रकार सर्व वयोगटांमधील व्यक्तींना करता येण्यासारखे आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment