मुंबई जगातील श्रीमंत शहरांच्या यादीत १२ व्या स्थानी


मुंबई : जगभरातील श्रीमंतांच्या यादीत देशाची आर्थिक राजधानी मुंबई झळकली असून अंदाजे ६१ लाख १२ हजार ७७५ कोटी रुपये संपत्ती असलेली मुंबई जगभरातील १५ श्रीमंत शहरांमध्ये १२ व्या स्थानी आहे. या यादीत न्यूयॉर्कने पहिला क्रमांक पटकावला आहे. न्यूयॉर्कची १९३ लाख कोटी रुपये अंदाजे संपत्ती आहे. ही माहिती ‘न्यू वर्ल्ड हेल्थ’ने अहवालात दिली आहे.

जगातील १५ श्रीमंत शहरांच्या यादीत न्यूयॉर्क (अमेरिका) ३ ट्रिलियन डॉलर संपत्तीसह पहिल्या, लंडन (यूके) २.७ ट्रिलियन डॉलरसह दुसऱ्या, टोकियो (जपान) २.५ ट्रिलियन डॉलरसह तिसऱ्या स्थानी आहे. तसेच या यादीत सॅन फ्रान्सिस्को (कॅलिफोर्निया), बीजिंग (चीन) , शांघाय (चीन), लॉस एंजेलस (कॅलिफोर्निया), हाँगकाँग, सिडनी (ऑस्ट्रेलिया), सिंगापूर, शिकागो, मुंबई, टोरंटो (कॅनडा), फ्रँकफर्ट (जर्मनी) आणि पॅरिस (फ्रान्स) शहरांचा देखील समावेश आहे.

ही संपत्ती म्हणजे त्या-त्या शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची एकूण वैयक्तिक संपत्ती असून यामध्ये मालमत्ता, रोकड, इक्विटी यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. सरकारी निधी यातून वगळण्यात आला आहे. सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या शहरांची यादी पाहता टॉप १० मध्ये मुंबई आहे. मुंबईत १ बिलियनपेक्षा जास्त संपत्ती असलेले २८ अब्जाधीश आहेत.

Leave a Comment