आज काय सांगत आहे गूगलचे डूडल


मुंबई : यंदाच्या विंटर ऑलिम्पिकला दक्षिण कोरियाच्या प्योंगचांग येथे शानदार सुरूवात झाली असून जगभरातील क्रीडाप्रेमी अवघ्या क्रीडा विश्वाचा हा उत्सव आपापल्या पद्धतीने साजरा करत आहेत. यात इंटरनेट जगतातील सर्वात मोठे सर्च इंजिन गूगलही सहभागी असून, हा आनंद गूगलने डूडल बनवून साजरा केला आहे. हा आनंद साजरा करताना डूडलमध्ये झळकणारे गूगलचे धावणारे कासव लक्ष्यवेधी ठरत आहे.

गूगल गेले दोन दिवस Winter Olympics Day 2018 दरम्यान चांगलेच फॉर्मात आहे. गूगलने कालच (शुक्रवार, ९ फेब्रुवारी) झाडावर बसवलेली चिमणी दाखवली होती. त्यानंतर गूगलने आजही (शनिवार, १० फेब्रुवारी) शानदार डूडल बनवले आहे. लक्ष्यवेधी असे की, आजचे गूगल डूडल हे GIF आहे. यात एक धावणारे कासव दिसते. आपण डूडलवर क्लिक करताच व्हिडिओ सुरू होतो. आपण ज्यात खेळाच्या मैदानावर वेगाने धावणारे कासव दिसते. कासव मंद गतीने चालण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण, डूडलमधले कासव अत्यंत वेगाने धावताना दिसत आहे. धावणारे कासव काही वेळात तोंड उघडते आणि जागेवर जाऊन बसते.

या डूडलमध्ये कासव एकटेच नाही. आणखी एक कासव या कासवासोबत आहे. म्हणजेच आपल्याला दोन कासवे, तीही रंगीत दिसतात. ज्यात एक पांढरा आणि दुसरा हिरव्या रंगाचा आहे. कासवांच्या पाठीवर पडणारी सूर्याची किरणे एक वेगळीच चमक दाखवतात. या किरणांसोबत ऑलिम्पीकचा सिंबॉलही पहायला मिळत आहे. महत्त्वाचे असे जो पर्यंत Winter Olympics Day 2018 चा उत्सव सुरू राहील तोपर्यंत गूगलकडून डूडलची मौज आपल्याला आनंद देत राहणार आहे.

Leave a Comment