फक्त एकाच माणसाला घाबरतात तुकाराम मुंढे


पुणे : नाशिकचे महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पुण्याहून बदली होवून आयुक्त म्हणून आलेले तुकाराम मुंढे यांचा धसका घेतला आहे, तर दुसरीकडे तुकाराम मुंढेंची नाशिक शहरातील तरूणाई फॅन झाली आहे.

तुकाराम मुंढे यांच्या नावाने सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या जात आहेत. कदाचित यामुळे महापालिकेच्या कारभारात सुधारणा होईल, अशी अपेक्षा तरूणांना असावी. दुसरीकडे अनेकांना कर्तव्यदक्ष तुकाराम मुंढे नकोसे झाले आहेत, नवी मुंबई नंतर पुण्यातही त्यांना धमकीची पत्र आली होती. पण तुकाराम मुंढे हे कधीही डगमगताना दिसले नाहीत.

तुकाराम मुंढे यांनी पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात तुकाराम मुंढे फक्त आपल्या वडील बंधूंना घाबरतात असे बोलून दाखवले होते, जगात मी माझ्या बंधूला सोडून कुणालाच घाबरत नाही, तुकाराम मुंढे यांच्या मनात आपल्या भावाबद्दल आदरयुक्त भीती आहे, असे त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता.