राजस्थानात सापडले सोन्याचे प्रचंड साठे


मरुभूमी म्हणून ओळख असलेल्या वाळवंटी राजस्थानात सोन्याचे प्रचंड मोठे भांडार असल्याचे भारतीय भूवैज्ञानिकांनी केलेल्या सर्व्हेक्षणात दिसून आले आहे. राजस्थानच्या उदयपुर जिल्यात, बांसवाडा, भागात ११.४८ कोटी टन सोने साठे दिसल्याचे महासंचालक एन कुटुंबा राव यांनी शुक्रवारी प्रत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले सोन्याव्यतिरिक्त राजस्थानात अन्य धातुंचेही मोठे भांडार आहे. भूकीया डकोच्या भागात ३५.६५ टन कोटी शीशे, जस्त साठे सापडले आहेत तर राजपुरा मध्ये भिलवाडा जवळही शिसे, जस्त साठे सापडले आहेत. २०१० पासून आत्तापर्यंत ८.११ कोटी टन तांबे साठीही मिळाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.