हे आहे जगातील सर्वात महाग गुलाब; जाणून घ्या ऐवढी आहे किंमत


व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात झाली असून तुम्हाला आम्ही जगातील सर्वात महाग फुलांविषयी माहिती सांगणार आहोत. वरील फोटोमध्ये दिसणारे हे गुलाब साधे-सुधे नसून ते अत्यंत महाग आहे. जुलिएट रोझ असे या गुलाबाचे नाव आहे. श्रीमंतामधील श्रीमंत व्यक्तीसुद्धा या गुलाबाला विकत घेण्यासाठी दोनदा विचार करतात कारण या गुलाबाची किंमत तब्बल 90 कोटी रुपये आहे.

अतिशय दुर्मिळ असलेला हे गुलाब फार मुश्कीलीने उगवतो. अनेक गुलाबांना मिळून हे गुलाब या गुलाबाचे ब्रीडींग करणारे प्रसिद्ध फुलतज्ञ डेविड ऑस्टीनने बनवले आहे. याबाबत पोलन नेशनने दिलेल्या रिपोर्टनुसार, डेविड ऑस्टीन यांना apricot-hued hybridनावाच्या रेअर प्रजातीपासून हे गुलाब बनविण्यासाठी 15 वर्षे लागली. त्यांनी हे गुलाब २००६ साली ९० कोटी रुपयाला विकले होते.

डेविड ऑस्टीन यांच्यामुळे प्रसिद्ध झालेले हे गुलाबाला आता कमी किंमतीत मिळत असून हे गुलाब आता २६ कोटी रुपयांना विकले जात आहे. तरीही हे गुलाब जगातील सर्वात महाग गुलाब म्हणून प्रसिद्ध आहे. याला ३ मिलीयन पाऊंड रोझ असे नावही देण्यात आले आहे.

Leave a Comment