मंगळ कक्षेत रस्ता भरकटली टेस्लाची स्पोर्ट्स कार


मंगळ ग्रहाच्या कक्षेत स्थिर करण्यासठी स्पेसएक्स कंपनीच्या फाल्कन हेवी रॉकेटमधून अंतराळात पाठविली गेलेली टेस्लाची स्पोर्ट्स कार भलतीकडे भरकटली असल्याचे वृत्त इनडीपेंडटने दिले आहे. या बातमीनुसार अॅलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने फाल्कन हेवी रॉकेटच्या सहाय्याने अंतराळात पाठविलेली स्पोर्ट्स कार रॉकेट पासून अलग होऊन मंगळ व पृथ्वी याच्या मधल्या कक्षेत स्थिर केली जाणार होती. रॉकेटपासून वेगळे होताना कार बाहेर ढकलण्यासाठी ज्या इंधनाचा स्फोट केला गेला तो खूपच प्रचंड होता व त्यामुळे ही कार निश्चित केलेल्या मार्गावरून भरकटली. हा कंपनीसाठी चिंतेचा विषय असून सध्या ही कार अन्य छोट्या ग्रहाजवळ आहे असे मस्क यांनी जाहीर केले आहे.


स्पेसएक्स या खासगी कंपनीने प्रथमच सरकारी मदतीशिवाय इतके मोठे रॉकेट लाँच करण्याचा प्रयत्न केला आहे. हे रॉकेट ६४ टन वजनाचे २३० फुट लांबीचे म्हणजे २३ मजली इमारतीएवढे आहे. हा प्रयोग यशस्वी झाला असता तर अमेरिकन एअरफोर्स साठी भविष्यात स्पेसएक्स कंपनी त्याचे उपग्रह अंतराळात पाठविण्यासाठी मदत करणार होती तसेच नासालाही त्यांची मदत होऊ शकणार होती.

Leave a Comment