चंद्रकांत पाटील यांचे ट्विटर अकाउंट हॅक


मुंबई – राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांचे ट्विटर खाते हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून ट्विटरवर त्याबाबतचा खुलासा स्वतः चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ट्‌विटर हॅक प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

२०१४ मध्ये चंद्रकांत पाटील यांनी आपले ट्विटर खाते सुरू केले होते. १३ हजार फॉलोअर्स त्यांचे ट्‌विटरवर आहेत. लोकांपर्यंत सरकारचे निर्णय पोहोचावे या हेतूने ट्विटरचा वापर केला जातो. ट्विट करण्याचे काम महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावतीने त्यांची एक खासगी टीम करते. असाच काहीसा प्रकार काही महिन्यांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या सोबतही घडला होता. ट्विटर हॅक प्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्या ट्विटर टीमकडून ‘माझे ट्विट अकाऊंट हॅक झाल्यामुळे माझ्या अकाऊंटवरून कोणत्याही प्रकारच्या पोस्टला केलेले लाईक अथवा रिट्विट ग्राह्य धरू नये’, असा खुलासा करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Comment