फिट राहण्यासाठी करा मसाला भांगडा.


काही व्यक्तींना संगीत आणि नृत्याचा इतका नाद असतो, की एखादे गाणे लागले, की त्याच्या ठेक्यावर अगदी खुर्चीमध्ये बसल्या बसल्या त्यांच्या पावलांचा ठेका सुरु होतो. या व्यक्ती एखाद्या पार्टीमध्ये नृत्य सुरु झाले, की सर्वात आधी डान्स फ्लोअर वर जाऊन पोहोचतात. नृत्याचे आणि त्यांचे नातेच तसे असते. ह्या नृत्याचा उपयोग व्यायाम म्हणून देखील केला जाऊ शकतो. नृत्याचा आनंद तर मिळतोच, पण त्याच्या जोडीने शरीराला आवश्यक तेवढा व्यायाम मिळून स्नायू चांगले टोन होतात आणि शरीरावरची जास्तीची चरबी घटण्यास देखील मदत होते. नृत्य म्हटले, त्यातील विविध प्रकारांमध्ये भांगडा या नृत्याप्रकाराचा जोश तो काही वेगळाच. त्यामुळे आता मसाला भांगडा नामक नवीन व्यायामप्रकार अस्तित्वात आणला गेला आहे.

मसाला भांगडा हे एक नवीन प्रकारचे वर्क आऊट असून, यामध्ये बॉलीवूडमधील भांगडा गीतांवर ठेका धरीत व्यायाम करायचा असतो. हा व्यायामप्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय होत आहे. याची सुरुवात मूळच्या भारतीय असलेल्या सरीना जैन यांनी अमेरिकेमध्ये केली. थोड्याच अवधीमध्ये का व्यायामप्रकार अमेरिकेमध्ये अतिशय लोकप्रिय झाला. या व्यायामप्रकाराच्या तीन वेगवेगळ्या लेव्हल्स आहेत. या व्यायामप्रकारामध्ये ठुमके आहेत, ‘शीमि‘ आहेत आणि पंजाबी लोकनृत्य ‘ गिद्दा ‘ देखील आहे. या तीनही नृत्य प्रकारांचा मिळून असा हा एक हाय इंटेन्सीटी वर्क आऊट आहे.

सर्व वयोगटातील व्यक्ती हा व्यायामप्रकार करू शकतात. याच्या निरनिराळ्या लेव्हल्स आणि इंटेन्सीटीज आहेत. ज्याने त्याने आपल्या सोयीप्रमाणे आपली लेव्हल निवडायची असते. यामध्ये सुरुवातीला वॉर्म अप असतो, त्यानंतर कोरियोग्राफी असते आणि त्यानंतर कुल डाऊन करिता काही स्टेप्स असतात. ह्या व्यायामप्रकारामुळे संपूर्ण शरीरातील स्नायूंचे उत्तम टोनिंग होते. विशेष करून खांदे, पोटाचे स्नायू आणि पाय यांना उत्तम व्यायाम होतो. या व्यायामप्रकारामुळे स्टॅमीना वाढण्यास मदत होते. ह्या व्यायामाचे एक सेशन सुमारे ४५ मिनिटे ते एक तासाचे असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment