फिट राहणे हे प्रत्येकासाठी गरजेचे आहे. जर तुम्ही फिट असाल, तर तुमचा फिटनेस हा इतरांसाठी प्रेरेणादायक ठरतो. तुम्हाला पाहून तुमच्या आसपास असणारे लोक फिटनेसच्या बाबतीत जास्त जागरूक राहू लागतात. अश्या वेळी तुमचा जोडीदार तुमच्या प्रेरणेपासून वंचित कसा राहील? तुमचा जोडीदार देखील फिट राहावा असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही स्वतः फिटनेस च्या दिशेने वाटचाल सुरु करायला हवी. फिट राहण्याच्या दृष्टीने केलेले तुमचे प्रयत्न पाहू तुमचा जोडीदार देखील फिट राहण्यासाठी तुमच्या प्रयत्नांमध्ये उत्साहाने सहभागी होईल. शास्त्रज्ञांच्या मते, एखाद्या दाम्पत्याने फिट राहण्यासाठी जर एकत्र प्रयत्न केले, तर ते प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते.
तुमची फिट राहण्याची सवय देऊ शकते तुमच्या जोडीदारालाही प्रेरणा
अमेरिकेतील कनेक्टिकट विद्यापीठातील शास्त्राद्यांच्या मते एखाद्याच्या वर्तनाचे चांगले वाईट परिणाम त्या व्यक्तीच्या आसपास राहणाऱ्या व्यक्तींवर होत असतो. एखादी व्यक्ती जा व्यायामाच्या किंवा आरोग्याच्या प्रति सजग असेल, तर त्याच्या या विचारसरणीचा परिणाम त्याच्या आसपासच्या व्यक्तीवरही परिणाम होत असतो. आपल्याबरोबर आपल्या जोडीदाराला हे तुम्ही तुमच्या फिटनेस रुटीन मध्ये सहभागी करून घेतले, तर त्याच्याही आरोग्याच्या दृष्टीने हे फायद्याचे तर ठरेलच, शिवाय तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत मनाप्रमाणे वेळ घालविण्यासाठी संधी मिळेल. जर तुम्ही फिट असाल, तर तुम्हाला साजेसे आपले व्यक्तिमत्व असावे असे तुमच्या जोडीदाराला नेहमी वाटत असते. त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी प्रेरणास्थान ठरू शकता.
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही