ग्रहण पाहताना घ्या ही काळजी…


चंद्र ग्रहण किंवा सूर्य ग्रहण पहावयाचे असल्यास अनेक सूचना दिल्या जातात. प्रत्येक जण आपापल्या परीने सूचना देत असतो. ग्रहणाच्या दिवशी काय करावे, किंवा काय करू नये, या संदर्भात आपल्याकडे निरनिराळे नियम आहेत. तसेच ग्रहण पाहताना त्यामुळे शरीराला कश्या प्रकारे हानी होऊ शकते, याबद्दल देखील निरनिराळे मते प्रचलित आहेत. सूर्य ग्रहणाच्या दरम्यान वातावरणात उत्पन्न होणाऱ्या सोलार रेडीयेशन्स मुळे डोळ्यांच्या नाजूक टिश्यूचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे दृष्टी कमी होण्याची शक्यता असते. यालाच रेटीनल सनबर्न असे ही म्हणतात. हा त्रास काही काळाकरिता जाणवू शकतो. पण जर टिश्यूला अधिक नुकसान झाले असेल, तर मात्र हा त्रास कायमचा होऊन बसतो. चंद्र ग्रहण पाहताना मात्र हा त्रास उद्भवत नाही. डोळ्यांवर कोणत्याही प्रकारचे आवरण न चढवता आपण चंद्र ग्रहण पाहू शकतो. ग्रहण पाहताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

सूर्य ग्रहण पाहताना डोळ्यांच्या सुरक्षेसाठी आवरण चढविणे गरजेचे आहे. विशिष्ट प्रकारचे सोलर फिल्टर असणारा गडद रंगाचा गॉगल ग्रहण पाहताना घालावा, किंवा एखाद्या जुन्या एक्स-रे फिल्म मधून सूर्य ग्रहण पाहावे. चंद्र ग्रहण पाहताना मात्र या साधनांची गरज नाही.

ग्रहणाच्या काळामध्ये काय करावे आणि काय करू नये, याबद्दल आपल्याकडे पूर्वीपासून काही नियम चालत आले आहेत. गर्भारशी महिला, आजारी व्यक्ती, वयस्क व्यक्ती आणि अगदी लहान मुले यांनी ग्रहण पाहू नये असे म्हटले जाते. ग्रहणाच्या काळामध्ये अन्नग्रहण करू नये, ग्रहणाच्या कालमध्ये वातावरणामध्ये घातक रेडीयेशन उत्पन्न होत असतात. ह्या रेडीटेशनचे परिणाम आपण खात असलेल्या अनावर होण्याची शक्यता असल्याने या काळामध्ये अन्न ग्रहण करू नये असे म्हटले जाते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment