
चीनी मोबाईल उत्पादक कंपनी विवो ने फिंगरप्रिंट सेन्सर डिस्प्लेच्या आत असलेला पहिला स्मार्टफोन विवो एक्स २० प्लस युडी नुकत्याच संपलेल्या सीईएस २०१८ मध्ये जगासमोर आणला आहे. अर्थात या फोन ची माहिती देताना त्याच्या किमतीचा खुलासा केला गेलेला नाही. हा फोन ब्लॅक गोल्ड, मेट ब्लॅक रंगात उपलब्ध केला जाणार आहे.या प्रकारचा हा पहिलाच फोन आल्याचा कंपनीचा दावा आहे
स्क्रीनच्या आत फिंगरप्रिंट सेन्सर असलेला विवो एक्स २० प्लस
या फोनसाठी ४ जीबी रॅम, १२८ जीबी इंटर्नल मेमरी ती मायक्रो कार्ड च्या सहाय्याने २५६ जीबी करण्याची सुविधा दिली गेली आहे. फोनला २४ एमपी व ५ एमपी चे रिअर कॅमेरे व २४ एमपी चा फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरी ३८०० एमएएच ची असून फोनचा स्क्रीन ६.४३ इंची फुल एचडी आहे. हा फोन फोर जी व्होल्ट ला सपोर्ट करणारा आहे.
