२०१८ मध्ये जगातील सर्वात वेगाने प्रगती करणारी भारताची अर्थव्यवस्था


नवी दिल्ली – २०१८ मध्ये जगातील सर्वात वेगाने प्रगती करणारी भारताची अर्थव्यवस्था असणार आहे. तसेच भारतची अर्थव्यवस्था चीनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे, असा अहवाल सँनक्टम वेल्थ मॅनेजमेंटने दिला आहे.

या अहवालात असे नमुद करण्यात आले आहे की, सध्या भारतातील शेअर मार्केट हे उसळी घेत असून जगातील ते पाचवे सर्वात मोठे मार्केट असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था मागील काही वर्षापासून जगात वेगाने प्रगती करणारी व प्रभावित करणारी होत आहे. भारतात राबविण्यात येणारे आधारकार्ड मोहिम, जनधन बँक खाते योजना, नोटाबंदी आणि सर्व प्रकारचे कर कमी करुन देशभरात एकच लागू करण्यात आलेली जीएसटी करप्रणाली हे या वेगाने प्रगत होत असणाऱ्या अर्थव्यवस्थेला मजबूत करत आहेत.

वेल्थ मॅनजेमेंट कंपनी पुढे म्हटले आहे की, २ किंवा ३ टक्के विकासाचा वेग विकसनशील देशाची अर्थव्यवस्था ही गृहित धरत असते. परंतु ७.५ टक्के विकास दरावर भारताने लक्ष्य केंद्रित केले आहे. भारतीय बाजारपेठ ही चीनच्या बाजारपेठेपेक्षा विस्तृत असून भारताने इतरही प्रगतीशील व्यवसायावर लक्ष्य केले आहे.

Leave a Comment