भारताला प्रगती करण्यासाठी परदेशी गुंतवणुकीची गरज आहेच पण पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी नेहमीच असे म्हटलेले आहे की, परदेशातून पैसा आणण्यासोबतच आपल्याला निसर्गाने काय दिले आहे याचाही विचार केला पाहिजे आणि त्याचा वापर करूनही पैसा कमावला पाहिजे, रोजगार निर्मिती केली पाहिजे. असा विचार केला असता असे दिसून येते की निसर्गाने आपल्याला तीन बाजूंनी समुद्र आणि एका बाजूला पर्वत दिला आहे. या समुद्र किनार्यांवर आणि पर्वताच्या कुशीत अनेक पर्यटन स्थळे निसर्गत:च निर्माण झाली आहेत. त्यासाठी आपल्याला कोणालाही पैसे द्यावे लागलेले नाहीत. तेव्हा आपोआप मिळालेल्या या स्थानांचा विकास केला तर आपला पर्यटन उद्योग बहरू शकतो आणि त्यातून रोजगार निर्मितीही होऊ शकते.
पर्यटन उद्योगात भरीव वाढ
केन्द्र सरकारने हा दृष्टीकोन स्वीकारून पर्यटन उद्योगाच्या वाढीसाठी वेगाने पावले टाकली असून त्याचे परिणाम जाणवत आहेत. विशेषत: सडका चांगल्या झाल्याने पर्यटन स्थळांना भेटी देणार्या पर्यटकांच्या संख्येत भरीव वाढ झाली आहे. २०१७ साली भारताला भेट देणार्या पर्यटकांची संख्या विक्रमी झाली असून तिने एक कोटीचा आकडा गाठला आहे. त्यातून भारताला २७ अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास १ लाख ६२ हजार कोटी एवढी कमायी झाली आहे. मुख्य म्हडणजे या कमायीत आता वाढ होणार आहे कारण पर्यटनाास अनुकूल अशा नामांकनातही भारताने झेप घेतली आहे. २०१३ साली भारताचा क्रमांक ६५ वा होता तो २०१७ साली ४० वा झाला आहे. म्हणजे चार वर्षात देशाने २५ क्रमांकांनी झेप घेतली आहे.
भारतात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेतच पण ईशान्य भारतात अशी स्थळे जाणीवपूर्वक विकसित करण्यात आली आहेत. त्याशिवाय निरनिराळे उत्सव आणि खेळ यांच्या निमित्ताने होणारे पर्यटनही वाढले आहे. परिणामी भारताच्या वट्ट राष्ट्रीय उत्पन्नात पर्यटन क्षेत्राचा वाटा ७ टक्के एवढा आहे आणि रोजगार निर्मितीत १२ टक्के वाटा आहे. या व्यवसायात रोजगार निर्मिती करण्याची मोठी क्षमता आहे. आता सरकार वाहतुकीच्या सोयीत क्रांतिकारक प्रगती करीत आहे. सागरमाला, भारतमाला अशा प्रकल्पांत सरकार अब्जावधींची गुंतवणूक करीत आहे. हवाई वाहतुकीतही बदल होत आहेत. त्यांचा वापर पर्यटनात नक्कीच होणार आहे. त्यातल्या त्यात सरकारने धार्मिक पर्यटनाला गती देण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास योजनांना मोठी गती दिलेली आहे. येत्या काही वर्षात हा उद्योग सर्वात लाभदायक होऊ ेशकतो.