मोटारींची गर्दी


मुंबईत २०१७ च्या नोव्हेंबर पर्यंत ३२ लाख मोटारी होत्या. तेव्हापासून दररोज सरासरी ७०० वाहनांची भर पडत आहे. तसा हिशेब केल्यास गेल्या दोन महिन्यांत ४२ हजार वाहने वाढली आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यांत ही संख्या ३३ लाखावर जाणे सहज शक्य आहे. ही तर मुंबईत नांंेंदल्या जाणार्‍या वाहनांची संख्या आहे. दररोज काही ना काही कामांसाठी आपल्या गाडीने येणारांची संख्या अमाप आहे. म्हणजे मुंबईच्या रस्त्यावर दररोज किमान ५० लाख वाहने फिरत असतात. मुंबईतल्या वाहनांचीच केवळ संख्या ३३ लाख असेल आणि मुंबईची आताची लोकसंख्या दोन कोटी असेल तर मुंबईतल्या वाहनांचे प्रमाण दर सहा माणसामागे एक कार असे पडते. दहा वर्षापूर्वी या बाबत चंडिगढ शहर आघाडीवर होते आणि तिथे वाहनांचे प्रमाण दर दहा जणांमागे एक आर असे होते. तेव्हा ते आपल्या वाढत्या समृद्धीचे लक्षण मानले गेले होते.

आता मुंबईत दर सहा माणसामागे एक कार असे आहे. अमेरिकेत दर दोन व्यक्तीमागे एक कार असे प्रमाण आहे. आपल्याला तेवढी समृद्धी गाठायला अजून उशीर आहे पण आताची समृद्धीच त्रासदायक वाटायला लागली आहे. कारण वाहनांची संख्या ज्या वेगाने वाढत आहे त्या वेगाने सुविधा वाढत नाहीत. वाहने काही पटींनी वाढत आहेत पण रस्ते तेवढेच आहेत. त्यामानाने रस्त्यांची रुंदी आणि वाहनतळांची संंख्या या दोन समस्या आहेत तशाच आहेत. त्यामुळे दोन प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पहिली समस्या म्हणजे वेगाची. आपल्याकडे वाहन आहे म्हणून आपण एका ठिकाणहून दुसर्‍या ठिकाणी वेगाने जाऊ या कल्पनेत कोणी असेल तर त्याची निराशा होत आहे कारण वाहनांची संख्या वाढल्याने गदीर्र् होत आहे. मुंबईत तर काही रस्त्यांवर कारला मुंगीच्या वेगाने जावे लागत आहे.

वाहने जेवढी जास्त तेवढे प्रदूषण जास्त. म्हणून वाढत्या वाहनांनी आपल्या सोबत प्रदूषणांचे संकटही घेऊन येत आहे. हीही एक समस्या निर्माण झाली आहे. लोक खिशात पैसा आहे म्हणून वाहने खरेदी करतात. आता मध्यमवर्गीयाची व्याख्या बदलली आहे. मध्यमवर्गीय लोक आता कार खरेदी करीत आहेत. आता कार घेतलीय म्हटल्यावर तिच्यात बसून फिरणे आलेच. त्यामुळे रस्त्यांंवर वाहने वाढतात आणि वाहतुकीची कोंडी होते. म्हणून पोलिसांवर लोकांनी आपल्या गाड्या रस्त्यावर न आणता सार्वजनिक वाहनांनी प्रवास करावा असे सांगण्याची पाळी येते. एकुणात वाहनांची संख्या वाढल्या तरीही मेट्रो, बसगाड्या, लोकल यांची संख्या वाढवावीच लागते.

Leave a Comment