टाळी वाजविली की या कुंडातून उसळते पाणी


भारतात अनेक नद्या, सरोवरे, तलाव आहेत व जवळजवळ प्रत्येकाबाबत कांही ना कांही दंतकथा आहे. त्यातील कांही श्रद्धेचा भाग आहेत तर कांही त्यांच्या रहस्यांमुळे प्रसिद्धीस आले आहेत. झारखंडच्या बोकारो जिल्ह्यातील दलाही कुंड असेच एक रहस्य बनले आहे. अनेक वैज्ञानिकांनी येथे संशोधन व अभ्यास करूनही त्याचे रहस्य अद्यापी कायम आहे. या कुंडासमोर टाळी वाजविली की त्यातून पाणी वर उसळते आणि ते इतक्या जोरात उसळते की जणू ते उकळते आहे असे वाटते.

याचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे हिवाळा असेल तेव्हा टाळी वाजविली गेली तर कुंडातून उसळणारे पाणी गरम असते व उन्हाळ्याचे दिवस असतील तर ते गार असते. बोकारोपासून २० किमी वर असणारे हे ठिकाण भाविकांच्या गर्दीने गजबजलेले असते. असेही सांगतात या कुंडात स्नान केले तर आयुष्यात कधीच कोणताही त्वचा रोग होत नाही. तसेच या कुंडासमोर श्रद्धेने केलेला नवस पुरा होतो. या कुंडाभोवती क्राँकीटचे कडे बांधले गेले आहे. हे पाणी जमुई कालव्यातून येते व गर्गा नदीत मिसळते असेही सांगतात. कुंडातील पाणी अतिशय स्वच्छ व औषधी असल्याचे मानले जाते. १९८४ पासून दर संक्रांतीला येथे मोठा मेळा भरतो. थेच जवळ दलई गोसाई यांचे मंदिर अ्रसून भाविक रविवारी तेथे दर्शनासाठी जातात.

Leave a Comment