आता एअरटेलनेही स्वस्त केले आपले ३ प्लान


नुकतेच जिओने आपले ४ प्लान स्वस्त केल्यामुळे जिओकडे ग्राहक आकर्षित होतील या भितीने नुकतेच एअरटेलनेही आपले ३ प्लान्स स्वस्त केले आहेत. आपल्या १९९, ३४९ आणि ४४८ च्या प्लानमध्ये कंपनीने बदल केल्यामुळे एअरटेलचे तुम्ही जर ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे. इंटरनेटचा जास्त वापर करणाऱ्यांसाठी हे प्लान जास्त उपयुक्त ठरतील असा दावा कंपनीने केला आहे.

आधी १९९ रुपयांच्या प्लानमध्ये केवळ पहिल्या महिन्याला १ जीबी ३ जी डेटा मिळत होता. पण त्याच किंमतीत कायम १ जीबी डेटा आता एअरटेलने देणार असल्याचे सांगितले आहे. याबरोबर अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल आणि रोज १०० मोफत मेसेजही मिळतील. २८ दिवस इतकी या प्लानची व्हॅलिडीटी आहे. ग्राहकांना ३४९ च्या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा दिला जातो. याबरोबरच अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल्स तसेच रोज १०० मेसेज मोफत मिळणार आहेत. या प्लानची मुदत २८ दिवसांची असून यामध्ये आधी १ जीबी डेटा मिळत होता.

एअरटेलने ४४८ च्या प्लानमध्येही बदल केले असून रोज या प्लानमध्येही १ जीबी डेटा मिळणार आहे. आधी या प्लानची मुदत ७० दिवसांची होती. ती आता ८२ दिवसांची करण्यात आल्यामुळे युजर्सना आता ८२ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लानमध्येही रोज १०० मेसेज आणि अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल मिळणार आहेत.

Leave a Comment