अशी असेल १० रुपयांची नोट


नवी दिल्ली – १० रुपयांची नवीन नोट भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) प्रसिद्ध केली असून ही नोट लवकरच चलनात आणली जाणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.

चॉकलेट ब्राऊन म्हणजेच आत्ताच्या १० रुपयांच्या नोटांपेक्षा थोड्या गडद रंगाची १० रुपयांची नवी नोट आहे. ओडिशा येथील जगप्रसिद्ध कोणार्क सूर्यमंदिराचे चित्र या नोटांच्या मागील बाजूवर आहे. समोरील बाजूस महात्मा गांधीचे चित्र असणाऱ्या सिरीजमधीच ही नोट असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सरकारकडून मागील आठवड्यामध्ये नवीन नोटांच्या डिझाइनला होकार मिळाल्यानंतर आठवड्याभरात रिझर्व्ह बँकेने १०० कोटी रुपये किंमतीच्या नोटा छापल्या आहेत. याआधी २००५ साली १० रुपयांच्या नोटांच्या रचनेत बदल करण्यात आला होता. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये २०० रुपयांच्या आणि ५० रुपयांच्या नवीन नोटा आरबीआयने चलनात आणल्या होत्या. त्यानंतर अवघ्या पाच महिन्यांमध्ये आरबीआय पुन्हा या नव्या १० रुपयांच्या नोटा चलनात आणणार आहे.

Leave a Comment