दगाबाज प्रियकरामुळे तरुणीने १ मिलियन डॉलरला विकायला काढले कौमार्य


इंटरनेटवर आपले कौमार्य विक्रीची जाहिरात अमेरिकेतील २३ वर्षीय कॉलेज तरुणीने दिली आहे. बेली गिबसन या तरुणीचे फोटो अपलोड करून नेवाडा येथील एस्कॉर्ट सर्व्हिस मूनलाईट बन्नी रांचने बोली लावली आहे. याबाबत मिळालेल्या तरुणीने स्वत:च्या कौमार्याची किंमत १ मिलियन डॉलर म्हणजेच ६.५ कोटी रुपये सांगितली आहे.

धक्कादायक बाब अशी की, एका वेबसाइटवर बेली हिने स्वत:च्या कौमार्याच्या विक्रीची जाहिरात दिली आहे. प्रियकराने तिची फसवणूक केल्यामुळे तिने हे पाऊल उचलले आहे. बेलीने सांगितले की, तिला लवकरात लवकर स्वत:चे कौमार्यभंग करायचे आहे. परंतु तिच्या यातून भरपूर पैसाही कमवायचा आहे.

याबाबत माहिती देताना एस्कॉर्ट सर्व्हिस मूनलाइटचे डायरेक्टर जर्मी लेमुर यांनी सांगितले की, १ दिवसआधी बेलीच्या कौमार्य विक्रीची जाहिरात एका वेबसाइटवर दिली होती. त्यावर लाखों हिट आले आहेत. जाहिरातील मिळत असलेला प्रतिसाद पाहाता बेलीला तिच्या कौमार्याचे १ मिलियन डॉलर नक्की मिळतील अशी अपेक्षा आहे.

एका मुलाखती दरम्यान बेलीने सांगितले की, ती एक वर्षाची होती, तेव्हा तिला एका धार्मिक कुटुंबाने दत्तक घेतले होते. बेलीचे वडील चर्चमध्ये काम करत होते. हे कुटुंब शिस्तप्रिय होते. कुटुंबाचे स्वतंत्र नियम होते. टीव्ही पाहाणे, गाणे ऐकण्यासही बंदी होती. बेली १६ वर्षाची झाल्यानंतर तिला गर्ल्स बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्यात आले होते.

शाळेतूनही बेलीला काढण्यात आले होते. नंतर तिने कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले. ती कॉलेजमध्ये एका मुलाच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली. काही वर्षे बेली त्याच्यासोबत राहिली. परंतु, त्यांच्यात कधी शरीर संबंध आले नाही. बेलीला त्याच्यासोबत लग्न करायचे होते. परंतु त्याने ऐनवेळी लग्नास नकार दिला. नंतर बेलीने कौमार्य विक्रीचा निर्णय घेतला.

Leave a Comment