२ हजारांनी स्वस्त झाला विवोचा V7 हा स्मार्टफोन


ग्राहकांची स्मार्टफोन कंपनी ‘विवो’ला मोठी पसंती मिळत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने विवो V7 हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. या फोनची लॉन्चिंगवेळी किंमत १८९९० रुपये होती. पण या फोनच्या किंमतीत आता २००० हजार रुपयांची कपात करण्यात आल्यामुळे हा फोन आता १६९९० रुपयांत मिळणार आहे. ऑनलाईनसोबतच ऑफलाईन स्टोअर्समध्ये विवो V7 या फोनची किंमत लागू झाली आहे. विवो ने V7+ या फोनच्या किंमतीत कुठल्याही प्रकारे कपात केलेली नाही. हा फोन बाजारात २१९९० रुपयांत मिळत आहे.

विवो V7 या फोनमध्ये २४ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पोट्रेट मोडही यामध्ये देण्यात आले आहे. या फोनच्या सेल्फी कॅमेऱ्यात एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये १६ मेगापिक्सलाच रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये फेस अनलॉक फिचरही उपलब्ध आहे.

Leave a Comment