जुन्या पिढ्या किंवा वृद्ध सध्याचे नवीन तंत्रज्ञान बदल समजून घेण्यात खूप संथ असतात. त्यांना हे बदल एका कोड्याप्रमाणे वाटतात. पण सर्वात मनोरंजक काळ तेव्हा येतो, जेव्हा आपण या नवीन तंत्रज्ञानाची आपल्या घरातील एखाद्या वयस्कर व्यक्तीला याची माहिती देतो. खरंतर, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर वेगळ्या प्रकारचे हावभाव पाहायला मिळतात, जे आपल्या आयुष्यात आधी क्वचितच पाहिले असतील.
गुगलने आजीबाईंना असे काही सांगितले आणि आजीबाईंनी मारली टेबलवरून उडी
आता नविन पिढीत घडलेल्या बदला बदल जाणून घेणाऱ्या या आजीबाईच पाहा. त्या सुमारे ८५ वर्षांच्या आहेत. त्या गुगल मुख्यपृष्ठावरून मिळालेल्या उत्तरामुळे हैराण झाल्या आहेत. आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ फ्लोरिडाचा आहे. हा व्हिडीओ जसा इंटरनेटवर टाकला गेला त्यानंतर हा मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला. याचे सर्वात मोठे कारण असे आहे की आपल्या घरातील वृद्ध लोकांच्या अशा प्रसंगी लोकांना आपल्या कुटुंबाची प्रतिक्रिया आठवली पाहिजे.
या वृद्ध स्त्रीला घरातल्या लोकांनी ख्रिसमसच्या दिवशी भेट दिली. या व्हिडिओमध्ये आपण महिलेला पाहिल्यास, तुमचे हसू थांबणार नाही. यातील वृद्ध स्त्री म्हणते की हे उपकरण खूप गूढ आणि धडकी भरवणारे आहे.
त्याचवेळी त्या महिलेच्या प्रतिक्रिया पाहून सर्व लोक पोट धरून हसू लागले. घरातील काही मंडळी या आजीबाईंना गुगलशी कसे बोलायचे आणि प्रश्न विचारण्याबाबत सांगत आहेत. आजीबाई व्हिडिओमध्ये असे म्हणत आहेत की ज्या पद्धतीने डिव्हाइस त्यांच्या दृष्टिकोणातून प्रतिसाद देत आहे, ते खूप भयावह आहे.व्हिडिओमध्ये आजीबाई गुगल ऐवजी, “गोओ गोओ” म्हणत आहे आणि त्यानंतर गुगलने असे काही उत्तर दिले, त्यामुळे या महिलेने टेबलवरून उडी मारली. युट्युब वापरकर्ता बेन एक्टिसने आपल्या ८५ वर्षांच्या आजीचा व्हिडिओ अपलोड केला आणि या व्हिडिओला फक्त तीन दिवसात ७७५,००० पेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे.