आज नाहीतर उद्या पाहता येणार चंद्राचे देखणे रुप


नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच उद्या सुरपरमून दिसणार आहे. सुपरमून याआधी मागील महिन्यातच दिसला होता. २ जानेवारीच्या पहाटे ३ वाजून ३४ मिनीटांनी सुपरमून दिसणार आहे. आपण उघड्या डोळ्यांनी हा चंद्र पाहू शकणार आहोत असे नेहरु तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी सांगितले. चंद्र पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीच्या जवळ आला तर त्याला ‘सुपरमून’ म्हटले जाते. यावेळी चंद्राची कक्षा लंबवर्तुळाकार असते, चंद्र दर महिन्यात काही काळ पृथ्वीच्या जवळ असतो तर काही काळ दूर जातो. पण अशाप्रकारे पृथ्वीच्या जवळ चंद्र येण्याच्या काळात पौर्णिमा आल्यास चंद्राचा आकार मोठा दिसतो त्याला सुपरमून म्हटले जाते.

वर्षातून एकदा किंवा दोनदा ही घटना होते.पण त्याचा नेमका कालावधी फार आधी सांगता येत नाही. चंद्र यावेळी १४ टक्क्यांनी मोठा दिसतो. तसेच ३० टक्क्यांनी त्याचा प्रकाशही वाढलेला असतो असेही परांजपे यांनी सांगितले. यानंतरचा सुपरमून नेमका कधी दिसेल सांगता येत नाही. त्यावेळी पृथ्वीपासून ३ लाख ५६ हजार किलोमीटर अंतरावर चंद्र येणार असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. एरवी पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर अंतरावर चंद्र असतो. परंतु मंगळवारी तो जवळ येणार असल्याने सुपरमून दिसेल.

Leave a Comment