नवीन वर्षापासून सौदी, यूएईमध्ये वॅट लागू


खाडी देशात प्रथमच सौदी अरेबिया व यूएईने महसूल वाढीसाठी १ जानेवारीपासून वॅट लागू केला असून बहुतेक सर्व वस्तूंवर ५ टक्के वॅट लावला जात असल्याचे समजते. यात खाद्यपदार्थ, कपडे.पेट्रोल, फोन, पाणी,वीज बिले, हॉटेल बुकंीग यांचाही समावेश आहे.

या देशांनी हायकवालिटी पेट्रोलचे दरही २७ सेंट म्हणजे १७ .३३ रूपयांवरून ३४.६७ रूपयांवर नेले आहेत. तरीही जगात सर्वात स्वस्त पेट्रोल येथेच मिळणार आहे. लो क्वालिटी पेट्रोलचे दर ८३ टक्कयांनी वाढविले गेले आहेत. या देशांनी अजून वैद्यकीय उपचार, अर्थसेवा व सार्वजनिक वाहतूक करमुक्त ठेवली आहे. तसेच आयकर आकारणीचा कोणताही विचार अद्याप तरी केला गेलेला नाही. या देशांपाठोपाठ बहारिन, ओमान, कतार व कुवेत हे देशही २०१९ पासून वॅट लागू करणार आहेत.

Leave a Comment