पोर्शेची पनामेरा हायब्रीड कार भारतात


पोर्शेने त्यांची लग्झरी कार पानामेरा भारतात आणली असून या कारची हायब्रिड व्हर्जन सादर केली गेली आहेत. इलेक्ट्रीक व हायब्रिड कार भारतीय बाजारात चांगला व्यवसाय करत असल्याचे दिसून येत असल्याने पोर्शेने उचललेले हे पाऊल कंपनीच्या हिताचे ठरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कंपनीने पेट्रोल हायब्रिड कारचे बुकींग खुले केले असून त्यांची डिलिव्हरी जानेवारी २०१८ पासून दिली जाणार आहे.

कंपनीने या कार तीन व्हेरिएंटमध्ये सादर केल्या आहेत. ई हायब्रिड, ई हायब्रिड एक्झीक्युटिव्ह व ई हायब्रिड स्पोर्टस टूरिझ्मो अशी ही तीन व्हेरिएंट आहेत. त्यांच्या किमती २ कोटी ३३ लाखांपासून २ कोटी ४५ लाखांपर्यंत आहेत. या कार ० ते १०० किमीचा वेग ३.५ सेकंदात घेतात. इंडियन स्पोर्टस कारने विक्रीत भारतात आघाडी घेतली असून वर्षाला कंपनी ४०० गाड्या भारतात विकते आहे असेही समजते.

Leave a Comment