पहिले बिटकॉईन ट्रेडिंग अॅप लाँच


देशातील पहिले बिटकॉईन ट्रेडिंग अॅप गुरूवारी लाँच करण्यात आले असून प्लूटो एक्स्चेंज नावाचे हे अॅप मोबाईल नंबरवर आधारित आहे. केवळ बिटकॉईनच नाही तर कोणत्याही क्रिप्टोकरन्सीच्या देवघेवीसाठी हे अॅप युजरला वापरता येणार आहे. त्यासाठी युजरला फक्त १ मोबाईल नंबर वापरावा लागणार आहे. त्याला चार डिजिट पिनचा वापरही करावा लागणार आहे. बिटकॉईनची खरेदी विक्री, स्टोअर्स तसेच अन्य खर्चही युजर या अॅपच्या माध्यमातून करू शकणार आहे.

या अॅप कंपनीचे सीईओ भरत वर्मा म्हणाले, या अॅपमुळे बॅकांच्या किचकट कामातून युजरला मुक्ती मिळेल. यामुळे खुला पेमेंट प्लॅटफॉर्म व डीसेंट्रलाईज्ड एक्स्चेंज चा अनुभव युजरना येईल. हे पहिलेच अॅप आधारित वॉलेट असून फक्त मोबाईल नंबरच्या वापराने ते युज करता येणार आहे. चांगली गुंतवणूक हे तरूणांचे स्वप्न असते मात्र ती गुंतवणूक सुरक्षितही हवी.हे अॅप त्यासाठी उपयुक्त आहे.

बिटकॉईनचा सध्याचा भाव एका कॉईनसाठी १५ हजार डॉलर्सवर आहे तर भारतात त्याची किंमत १० लाख रूपये आहे. आज बिटकॉईनमध्ये भारतात गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर होत असून कंपनीचे मुख्यालय दुबई येथे आहे तर आयटी कार्यालय दिल्ली येथे आहे.

Leave a Comment