जास्तवेळा पॉर्न पाहतात त्यांचा अध्यात्माकडे जास्त कल – सर्वेक्षण


आपल्याकडे अजूनही एखादा व्यक्ती पोर्न चित्रपट बघतो म्हटल्यावर भुवया उंचावल्या जातात. अशा साईटसवर हा विषय काहीसा निषिद्ध मानला जात असल्याने बंदी आणणे, किंवा ठराविक काळासाठीच त्या दाखवणे असे नियमही केले जातात. पण तुम्हाला ही गोष्ट वाचून नक्कीच धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. आठवड्यातून एकहून जास्तवेळा जे लोक पॉर्न पाहतात अध्यात्माकडे त्यांचा जास्त कल असतो असे नुकतेच एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

१३०० जणांच्या मानसिकतेचा सॅम्युएल पेरी या अमेरिकन अभ्यासकाने ६ वर्षे अभ्यास केल्यावर हा निष्कर्ष निघाल्याचे आपल्या वृत्तात इंडिपेंडंट वृत्तपत्राने म्हटले आहे. आपण पॉर्न पाहिल्यामुळे काहीतरी गुन्हा केला आहे अशी अपराधीपणाची भावना मनात आल्याने कालांतराने पॉर्न पाहणारे आंबटशौकीन प्रार्थनेकडे जास्त प्रमाणात आकर्षित होतात असे पेरी यांनी आपल्या अभ्यासात म्हटले आहे. यामध्ये अशाप्रकारचे व्हिडिओ आठवड्यातून एकदा किंवा त्याहून जास्त वेळा पाहणारे लोक श्रद्धाळू असतात आणि प्रार्थना करण्याचे त्यांचे प्रमाणही जास्त असते असे पेरी यांचे म्हणणे आहे. ज्यांना अशाप्रकारचे चित्रपट पाहताना सर्वाधिक आनंद होतो ते जास्त धार्मिक असतात असेही पेरी यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment