अगदी कमी कालावधीत भारतात रिलायन्स जिओ या टेलिकॉम कंपनीने आपले स्थान निर्माण केले असून जिओने ग्राहकांच्या खिशाला परवडतील अशा एकाहून एक उत्तम ऑफर्स देत ग्राहकांची पसंती मिळवल्यानंतर जिओने त्यांना आकर्षक कॅशबॅक ऑफर्स देत अधिकच खूश केले आहे. नुकतीच आपली आणखी एक ऑफर जिओने जाहीर केली असून ३९९ रुपयाचे रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना तब्बल ३३०० रुपयांची कॅशबॅक मिळणार असल्यामुळे जिओची सेवा तुम्ही वापरत असाल तर ही संधी अजिबात वाया घालवू नका.
जिओच्या ३९९ रुपयांच्या रिचार्जवर मिळणार ‘एवढा’ कॅशबॅक
४०० रुपयांचे माय जिओ कॅशबॅक व्हाऊचर्स यामध्ये मिळतील. वॉलेटमध्ये ३०० रुपयांचे तत्काळ कॅशबॅक व्हाऊचर्स जमा होतील. तर ई-कॉमर्स साईटसचे २६०० रुपयांपर्यंतचे डिस्काऊंट व्हाऊचर्स मिळणार आहेत. कंपनीने याआधी ३९९ आणि त्याहून अधिक रुपयांच्या रिचार्जवर जवळपास २५९९ रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर जाहीर केल्यानंतर आता ही आणखी एक धमाकेदार ऑफर जाहीर केली आहे.