जगातील या गावात आहे कपडे घालण्यावर बंदी


जगातील सर्व देशांतील राहणीमान आणि खाण्याच्या सवयींमध्ये फरक आपल्याला दिसतोच. परंतु असे म्हटले जाते ना कि एखाद्याच्या पेहराव्यावरून त्याचा देश कोणता याचा अंदाज लावला जावू शकतो. पण येथे तर तुम्हाला कोणाच्याही शरीरावर कपडे दिसणार नाहीत. पण जगात असे देखील एक गाव जिथे लोक कपडे घालतात नाही आणि नग्न राहतात, ते पण संपूर्ण आधुनिक जीवन शैलीसह. पण हे लोक नग्न का राहतात हे जाणून घेऊ या.

यूकेमधील हर्टफोर्डशायरपासून बर्कट्रायवूड येथे दूर असलेल्या एका छोटेसे गाव आहे ‘स्पीलप्लाट्ज’, जिथे लोक गेल्या ८५ वर्षांपासून निर्वस्त्र राहत आहेत. मग ती एक स्त्री असो किंवा पुरुष असो.

विशेष गोष्ट अशी आहे की पर्यटक काही दिवस सुट्टीसाठी येथे घर भाड्याने घेऊन येथे राहतात. हे पर्यटक देखील पूर्णपणे नग्न राहतात. परंतु पर्यटक त्या गावाच्या नियमांचे पालन करतात याची काळजी घेणे आवश्यक आहे.

येथे लोकांचे स्वतःचे पब, जलतरण तलाव, बंगले आणि अन्न आणि पिण्याची व्यवस्था आहे. या गावाबाबत अजूनही ब-याच लोकांना माहिती नाही. हे गाव १९२९मध्ये इसुल्ट रिचर्डसन यांनी शोधून काढले.

मग लोकांनी निर्णय घेतला की ते निसर्गाच्या सानिध्यात राहतील आणि पूर्णपणे नैसर्गिकरित्या जगतील. तेथील लोकांना थंडीत कपडे घालण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.

Leave a Comment