केवळ एका मिनिटात हाताने फोडले १२२ नारळ


नवी दिल्ली: नारळ सोलणे आणि फोडणे किती कठीण काम आहे आपल्यापैकी प्रत्येकालाच माहीत आहे. असे खूपच कमी लोक आहेत जे सहजपणे नारळ सोलू किंवा फोडू शकतात. परंतु जर तुमच्या समोर अशी एक व्यक्ती आली कि जी सहजपणे नारळ फोडतो तर तुम्हाला आश्चर्य नक्की वाटेल. केरळमध्ये राहणारे अभिषक पी. डोमिनिक यांनी आपल्या हातांनी अनेक नारळ फोडले आहेत.

अभिषची ही कामगिरी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवली गेली आहे. अभिषने एका मिनिटात शंभरपेक्षा अधिक नारळ फोडले आहेत. यापूर्वी डॉमिनिक यांनी कोट्टायम सिटीमध्ये असा विक्रम केला होता. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकृत YouTube चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड केला गेला आहे. अभिषने यापूर्वी देखील एका मिनिटात ११८ नारळ फोडले होते. आता त्याने त्याचाच रेकॉर्ड तोडला आहे.

या व्हिडिओमध्ये, हे लक्षात येते की एका लहान भिंतीवर १४० नारळ एका लांब ओळीत ठेवले आहेत. त्याचा उत्साह वाढविण्यासाठी अनेक समर्थक तेथे आहेत. अभिष नारळ फोडण्यासाठी तयार झाले असून त्याचे समर्थक त्याला प्रोत्साहन देत आहेत. डोमिनिक नारळ फोडण्यास सुरवात करतो आणि बघता बघता एका मिनिटात तो १२२ नारळ फोडण्यात यशस्वी होतो.

या संदर्भात त्यांनी सांगितले, मी हा विक्रम मोडण्याचा निर्णय घेतला, कारण मी एका दुर्गम खेड्यातून आलो आहे आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् आपले देखील नाव असावे असे आपल्यापैकी कोणाचेही स्वप्न आहे. डॉमिनिक म्हणाले, मी एक दृढ निर्धारक व्यक्ती आहे आणि मला ठामपणे लोकांच्या इच्छाशक्तीवर विश्वास ठेवतो.

हा व्हिडिओ खूप छान आहे. यावर विविध प्रतिक्रिया देखील येत आहेत. यावर टिप्पणी दिली आहे कि हा हात नाही, तो हातोडा आहे.

Leave a Comment