या व्यक्तीने जमिनीपासून २०० फुटांवर असे काही केले ज्यामुळे रोखले गेले श्वास


नवी दिल्ली: एखाद्याला उंचीपासून भीती वाटते, तर कोणीतरी त्याला खेळ बनवतात. हे आपण अजय देवगण आणि आमिर खानच्या इश्क या चित्रपटामध्ये पाहिलेच असेल ज्यात अजय देवगण आणि आमिर खान दोन इमारतींमध्ये खांबावर उभे आहेत आणि दोन बिल्डिंगमधील अंतर पार करण्यास घाबरतात. पण पॅरिसमध्ये याच्या विपरीत पाहण्यास मिळाले. एका माणसाने जमिनीवरुन २०० फूट पायी चालण्याचा कारनामा केला आहे. लोकांनी ते पाहिले आणि त्यांचे श्वास रोखले गेले. कोणालाही हे कळत नव्हते की हा माणूस इतक्या उंचीवर आणि रश्शीवर का चालत आहे.

फ्रान्समधील पॅरिसच्या आयफेल टॉवरजवळील सेन नदीवर २३ वर्षीय नाथन पॉलिन रश्शीवर चालत होता. त्याला तो दोर ओलांडण्यासाठी अर्धा तासांपेक्षा जास्त वेळ लागला. याचे टीव्हीवर थेट प्रेक्षपण करण्यात आले होते. हा माणूस विचित्र रोगांच्या संशोधनासाठी पैसा गोळा करण्यासाठी रश्शीवर चालत होता. CGTN ने हा व्हिडीओ YouTube वर अपलोड केला आहे, जो खूपच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हे दाखवण्यात आले आहे की पॉलिन आयफेल टॉवर आणि ट्रोकाडोरो स्क्वेअरमध्ये असलेल्या सेन नदीवर पायी चालत आहे. जो तो यशस्वीरित्या पार करतो. त्याने हा कारनामा ९ डिसेंबर रोजी केला आहे.

नाईन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पॉलिनने शहरी क्षेत्रातील सर्वात लांब रश्शीवर चालण्याचा कारनामा केला आहे. एवढेच नाहीतर त्याने एक दिवस आधी येथेच चालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने ही कामगिरी केली.

Leave a Comment