फेसबुक देत आहे पैसे कमवण्याची सुवर्णसंधी; पण कशी घ्या जाणून?


नवी दिल्ली : तरुणाईमध्ये सध्याच्या घडीला व्हिडिओबद्दल असलेली क्रेझ कमालीची असून काही वाचण्यापेक्षा काही ऐकणे, पाहणे अधिक लोकांना आवडते. म्हणून तुम्हालाही व्हिडिओ संदर्भात काही काम करायला आवडत असेल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे.

युट्युब व्यतिरिक्त अजून एक पर्याय व्हिडिओ क्रिएटर्ससाठी उपलब्ध असून फेसबुकने युट्युबला टक्कर देण्यासाठी व्हिडिओ वेबसाईट क्रिएटर लॉन्‍च केली आहे. यावर तुम्ही देखील तुमचे व्हिडिओ अपलोड करू शकता, सर्च करू शकता, लाईक व कमेंट देखील करू शकता.

त्याचबरोबर यू-ट्यूबच्या माध्यमातून तुम्ही कमाईही करू शकता. फेसबुक सध्या क्रिएटरवर फक्त रजिस्‍ट्रेशन होत असून यातून लवकरच कमाईची संधी उपलब्ध होणार असल्याचे फेसबुकने सांगितले. वेबसाईटबरोबरच याचे अॅप देखील लॉन्च करण्यात येणार आहे. पण अॅप फक्त iOS यूजर्ससाठी असेल. पण हे अॅप लवकरच अॅनरॉई़ड युजर्ससाठी देखील लॉन्च करण्यात येईल.

फेसबुक क्रिएटरवर तुम्हाला रजिस्‍ट्रेशन करायचे असल्यास सर्वात आधी www.facebook.com/creators या वेबसाईटवर जा. त्यानंतर ज्वाईनवर क्लिक करा. यासोबतच फेसबुक अकाऊंट लॉगईन असणे गरजेचे आहे. आवश्यक ते डिटेल्स त्यानंतर देणे आवश्यक आहे. तुम्हाला यानंतर आपल्या व्हिडिओ चॅनलची यूआरएल द्यावी लागेल.

लेट्स डू वर त्यानंतर क्लिक करा. तुमची रजिस्‍ट्रेशन प्रक्रिया यावर क्लिक केल्यावर सुरू होईल. रजिस्‍ट्रेशन केल्यानंतर फेसबुक तुम्हाला ईमेलवरून नियम व अटींची पुर्ण माहिती देईल. तुम्ही फेसबुक व्हिडिओ चॅनलचे प्लॅनिंग ते वाचून करू शकता.

फेसबुक क्रिएटरवरून पैसे कमवण्याचे चार मार्ग आहेत. ब्रांडेड कंटेंट, मर्चेंडाइज, टूर्स आणि अॅड ब्रेक्‍स. यात अॅड ब्रेक्स सर्वात महत्त्वाचे आहे. अधिकतर लोक यातून कमाई करतात. अॅड ब्रेक्समध्ये तुमच्या व्हिडिओमध्ये अॅड्स येतात. हा सध्या प्रक्रिया सुरू असून ते लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. हे सुरू झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओतून चांगली कमाई करू शकतात.

Leave a Comment