या मुलाला मुलींप्रमाणे येते मासिक पाळी


नवी दिल्ली : वॉशिंगटनमध्ये राहणारा पंधरा वर्षांचा कॅस क्लेमर आपल्या वयाच्या इतर मुलांप्रमाणेच तोही खेळायचा, बागडायचा. त्याच्याकडे त्यामुळे फार कोणी लक्ष दिले नाही पण अचानक एक दिवस त्याला मासिक पाळी आली आणि त्याची ओळखच बदलली. कॅसला मुलींप्रमाणे प्रत्येक महिन्याला मासिक पाळी येते. आता कॅस क्लेमर समलैंगिक आहे.

त्याने आपल्या या लैंगिक बदलामुळे आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. कॅस म्हणायचा की, त्याच्या शरीराने त्याला धोका दिला होता. त्याची प्रत्येक महिन्याचे पाच दिवस ओळख बदलायची. मला जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा मी नव्याने ते पाच दिवस जगतो. धड मुलगी ही नाही आणि मुलगाही नसल्याने मी खूप रडायचो. पण कॅस आया सगळ्याला खचून न जाता ता धैर्याने समलैंगिकांविषयी जनजागृतीचे काम करत आहे. आता तो एक ‘पीरियड अॅक्टिविस्ट’ आहे. खरतर हा मुद्दा असा होता की या विषयी कॅस कोणाशीही मोकळेपणाने बोलू शकत नव्हता पण आता तो त्याच्यासारख्या समलैंगिकांसाठी लढत आहे. ‘द अॅडव्हेनचर्स ऑफ टोनी द टॅम्पॉन’ हे पुस्तकही त्याने लिहिले आहे. त्याने सोशल मीडियावर त्याच्या पुस्तकावरून मोठी जनजागृतीही केली.

Leave a Comment