यूट्यूब व्हिडिओ आता व्हॉट्सअॅपमध्ये होणार प्ले


नवी दिल्ली – आता यूट्यूब व्हिडिओ प्ले करण्याची सुविधा आयफोनच्या नव्या व्हॉट्सअॅप अपडेटमध्ये उपलब्ध होणार आहे. पण यासाठी तुम्हाला अॅप स्टोअरमध्ये जाऊन व्हॉट्सअॅपचे अपडेट डाउनलोड करावे लागणार आहे. युट्यूब व्हॉट्सअॅपमध्ये लिंक आल्यानंतर व्हिडिओ अॅपमध्येच प्ले करता येणार आहे. यासंदर्भात @WABetaInfo या ट्विटर अकांउंटवर दिलेल्या माहितीनुसार, ही सुविधा सध्या फक्त आयफोनसाठी उपलब्ध होणार आहे. पण हे फिचर एँड्रॉईडवर कधी येणार याची माहिती मिळालेली नाही. ही सुविधा आज (बुधवार) रात्रीपासून उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment