ट्विटरवर असे काही केले बंद होईल तुमचे खाते


नवी दिल्ली: सध्या सोशल मीडिया आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला असून कोणासाठी टाईमपाससाठी तर कोणासाठी गरज बनली आहे. आजही लोक सोशल मीडियाद्वारे व्यवसाय देखील करत आहेत. एवढेच नाही तर, कोणालाही ट्रोल करणे किंवा शिवीगाळ देणे असे सर्व काही सोशल मीडियावर घडते. अशा प्रकारे, ट्विटरवर असे काहीतरी घेऊन आले आहे की ज्यामुळे ट्रोल हा प्रश्न मोठ्या प्रमाणात संपुष्टात येईल. होय, १८ डिसेंबरपासून ट्विटरवर काही नवीन नियम समाविष्ट केले जातील. ज्यात या नियमांचा देखील समावेश आहे.

असे दिसून येते की कोणावर टीका करण्यासाठी किंवा टर उडवताना अनेकजण चुकीच्या भाषेचा भाषा वापर करतात. जे याआधी डिलीट केले जाऊ शकत नव्हते. ट्विटरच्या नवीन हेटफ़ुल कंडक्ट पॉलिसीनुसार, १८ डिसेंबरपासून एखाद्या व्यक्तीला शिवीगाळ किंवा ट्रोल करण्याचा प्रयत्न केला ट्विटर त्याचे खाते सस्पेंड करणार आहे. जर कोणी असे करण्याचा प्रयत्न केला तर ट्विटर प्रथम वापरकर्त्याला ट्वीट हटवण्याची सूचना देईल. आपण तरी देखील तसे केले तर ट्विटर तुमचे खाते सस्पेंड करणार आहे.

या गोष्टी केल्यासही बंद होईल खाते
* बौद्धिक संपत्तीची चोरी
* ग्राफिक द्वारे प्रौढ सामग्री
* इतर कोणासारखे वापरकर्ता नाव तयार करण्याचा प्रयत्न केल्यास
* खोटे सत्यापन बेज दाखवण्याचा प्रयत्न

कित्येकवेळा असे निदर्शनास आले आहे की कुणीतरी अपमानास्पद भाषा वापरल्याचा प्रयत्न केला किंवा त्याची तक्रार केली. त्यानंतर, ट्विटरने कारवाई केली आहे. ब-याच वेळा बॉलिवूड कलाकारांना ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला गेला आहे. त्यानंतर देखील तक्रारी केल्या गेल्या आहेत. पण १८ डिसेंबर पासून कुठलीच तक्रार न घेता ट्विटर स्वत: यावर कारवाई करणार आहे.

Leave a Comment