काश्मीरात यंदा केशराचा दरवळ नाही


यंदा काश्मीरमध्ये चोहोबाजूनी फुलणारे केशराचे मळे यंदा फुलांविनाच असल्याचे केशराच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. केशर उत्पादनावरच उदरनिर्वाह असणारे शेकडो शेतकरी यामुळे अडचणीत आले असून गेले चार महिने काश्मीरात पावसाने दडी मारल्याने केशर उत्पादन घटले व त्यामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

काश्मीरच्या पंापोर भाग प्रामुख्नाने केशराच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. यंदा पाऊसच न झाल्याने अवघे ५ टक्के इतकेच केशर उत्पादन झाले आहे. सप्टेंबर ते आक्टोबर या काळात केशर तयार होते. या काळात या भागात हजारो लोक केशराची फुले खुडण्याचे काम करत असतात. मात्र यंदा केशर फुललेच नाही.केशर उत्पादक शेतकर्‍यांच्या म्हणण्यानुसार दरवर्षी केशराचे उत्पादन घटत चालले आहे. ज्या शेतात २०० तोळ्यांपर्यंत केशर व्हायचे तेथे २ तोळेही नाही. अनेक शेतकर्‍यांचे सर्व कुटुंबिय याच उद्योगावर अवलंबून आहेत. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

जम्मू काश्मीर केशर असो.चे अध्यक्ष अब्दुल मजीद म्हणाले, २०१७ साल केशर शेतकर्‍यांसाठी फारच वाईट ठरले आहे. गेले चार महिने पाऊस नाही त्यामुळे उत्पादन १ ते २ ट्क्के इतकेच आहे. यामुळे शेतकर्‍यांचे सुमारे २ अब्ज रूपयांचे नुकसान झाले आहे. २०१० साली नॅशनल सॅफ्रन संस्था सुरू होऊन त्यासाठी ४०० कोटी रूपये खर्च केले गेले. या योजनेनुसार १२८ट्यूबवेल खोदल्या जाणार होत्या मात्र गेली ७ वर्षे हे काम अपुरेच आहे. त्यामुळे केशर शेतीला पुरेसे सिंचन करता येत नाही. गतवर्षी पांपोर भागात १७ टन केशर उत्पादन झाले होते ते यंदा १ टन तरी होईल का नाही याची शंकाच आहे.

Leave a Comment