आता गुगल मॅपच्या माध्यमातून करा कमाई


नवी दिल्ली : आपल्या आयुष्यात गुगलला एक महत्वाचे स्थान प्राप्त झाले असून अनेकांना गुगल आणि इंटरनेटशिवाय जगण्याची कल्पना करणेही शक्य नाही. गुगल मॅप हे गुगलमधील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या फिचर्सपैकी एक होय. गुगल मॅपचा वापर एखाद्या ठराविक ठिकाणी जाण्यासाठी बहुतांश लोक करतात. गुगल आपल्या युजर्सला गुगल मॅचच्या सहाय्याने सलग अपडेट्स देत असतो.

तुम्ही जर अज्ञात स्थळी रस्ता भटकले असाल तर तुम्ही गुगल मॅपच्या मदतीने योग्य ठिकाणी पोहचू शकता. आम्ही तुम्हाला आज अशा ८ ट्रिक्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही गुगल मॅप आणखीन चांगल्या प्रकारे वापरु शकता आणि त्याचबरोबर गुगल मॅपसोबत मिळून तुम्ही पैसेही कमावू शकता. तुम्ही नेटवर्क किंवा इंटरनेट नसतानाही गुगल मॅप वापरु शकता. वाय-फाय ज्यावेळी तुमच्या फोनला कनेक्ट होते त्यावेळी तुमचे मॅप आपोआप अपडेट होण्यास सुरुवात होते.

तुम्ही तुमच्या घरचा पत्ता, ऑफिसचा पत्ता किंवा नातेवाईकांचा पत्ताही गुगल मॅपवर अॅड करु शकता. तुम्ही यामुळे वारंवार रस्ता चूकू शकत नाही. यामुळे नेव्हिगेशनमध्येही खूप मदत होते. तुमचा एखादा मित्र जर तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे आणि त्याला तुमचे लोकेशन शोधण्यात अडथळा येत आहे. तर त्याच्यासोबत आपले लोकेशन देखील शेअर तुम्ही करु शकता. तो याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अगदी सहज पोहचू शकतो.

तुम्ही आपल्या आवडत्या दुकानांत, मॉल्समध्ये जर वारंवार जात असाल तर ही ठिकाणे तुम्ही आपल्या मॅपवर सेव्ह करु शकता. यामुळे नेव्हिगेशनमध्ये कुठलाच अडथळा तुम्हाला येत नाही. तुम्ही या मॅपचा वापर तुमचा प्रवास सुखकर करण्यासाठी करु शकता. तुम्ही ट्रेन, बस तसेच प्रवासासाठीच्या इतर माध्यमांची वेळ आणि येण्या-जाण्याचे ठिकाण या मॅपच्या मदतीने तपासू शकता.

तुम्ही नेव्हिगेशनचा वापर ज्यावेळी करता त्यावेळी दोन्ही हातांचा वापर करत झुम करणे सोपे नसते. तुम्ही त्यासाठी डबल टॅप करुन झुम करु शकता. तुम्ही जर एखाद्या ठिकाणी फिरून आला आहात आणि त्याच ठिकाणी तुम्हाला पुन्हा जायचे आहे, पण रस्ता लक्षात नाही? तर तुम्हाला रस्ता शोधण्यास गुगल मॅप मदत करेल. गुगल मॅप आणखीन चांगले बनविण्यासाठी जर तुम्ही मदत कराल तर गुगल त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे देते. तुम्हाला यासाठी तुमच्या आसपासच्या जागा, लोकेशनची माहिती गुगल मॅपवर योग्य पद्धतीने द्यावी लागणार आहे.

Leave a Comment